Garbh sanskar by Dr sharda mahadule Marathi

Add to cart
  • Description

      

गर्भावर चांगले संस्कार कसे करावेत ? :

 आई-वडील व घरातील मंडळींच्या सात्त्विक विचारांचाही गर्भाच्या मनावर परिणाम होतो. या सात्त्विक वातावरणाचे मुलाच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर चांगले परिणाम होतात. संत वा*मय, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता यांपैकी वाचन करावे. संतांची, देवांची, चरित्रे वाचावीत. मनक्षोभ होईल असे वाड्मय , रहस्यकथा वाचू नयेत किंवा वाहिन्यांवरील मारामाऱ्या, खून यांसारखी भीती, दु:ख किंवा क्रोध निर्माण करणारी दृश्ये बघू नयेत. गरोदर स्त्रीला ज्या देवतेचे, संतांचे किंवा वीरपुरुषांचे गुण आपल्या मुलात यावे, असे वाटत असेल, त्याची मूर्ती किंवा छायाचित्र समोर ठेवून त्यावर ध्यान करावे. ध्यानाच्या शेवटी गर्भवती स्त्री काही आवश्यक सूचनाही देऊ शकते. गर्भवती स्त्रीने नामजप करावा. आईचा आहार, विहार, विचार व इच्छा यांचा गर्भावर परिणाम होतो. गर्भवतीच्या उत्तम आचार-विचारांचा गर्भाच्या मनावर ठसा उमटतो.